मंगळवेढा (जि़सोलापूर): गेल्या साडे चार वर्षांच्या काळात शेतकºयाला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय. निवडणुकात पाणी आणतो म्हणून भूलथापा मारणाºयांना ठोकून काढा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले़
हुन्नूर (ता़मंगळवेढा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकºयांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते़भाजपला मदत केल्याचा आता पश्चाताप होतोय असे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकºयांना न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. कृष्णा खोºयातील पाणी कर्नाटकात वाया जाते़ हेच पाणी अडवून या भागाला दिले ता दुष्काळी तीव्रता कमी होवू शकेल़ पण पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण? म्हणून पाणी आणण्याची नेत्यांची इच्छा होत नाही, असे त्यांनी सांगितले़दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत. शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे. मागील सरकारच्या काळात छावणीत भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली पण दावणीलाही नाही व छावणीत नाही, अशी टीका त्यांनी केली़