आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एम. डी. पॅथॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त शिक्षण असलेल्या व्यक्तींनाच पॅथॉलॉजी टेस्ट करता येतात. शहरातील ४८ पॅथॉलॉजीमध्ये या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पॅथॉलॉजी संघटनेने कळविले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने महापालिका आरोग्य विभागाने शहरातील ४८ पॅथॉलॉजी तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. २०१७-१८ या कालावधीत जिल्ह्यात १३ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. बनावट वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पॅथॉलॉजी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. आशा कुमठेकर, डॉ. भारत मुळ्ये, डॉ. नीलकंठ पोतदार यांनी आपली बाजू मांडली. रुग्णाला पॅथॉलॉजीकडून अहवाल देताना त्यावर एम. डी. पॅथॉलॉजिस्ट किंवा एम. डी. मेडिसीन यांची सही असणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बºयाच पॅथॉलॉजीकडून हे नियम पाळले जात नाहीत. यासंदर्भातील यादीही त्यांनी सादर केली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भातील कायदे व नियम यांची माहिती घेऊन तातडीने यासंदर्भात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी अवयवदान चळवळीबाबतही चर्चा झाली. जिल्हा अवयवदान समन्वय अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी याबाबत माहिती दिली.बोगस डॉक्टरांवरील कारवाईत एकसूत्रीपणा हवा ४जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत कडक धोरण राबविण्याचे आदेश दिले. बनावट वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात एकसूत्रीपणा हवा आहे. विविध विभागाने एकत्रित येऊन कारवाई केल्यास कारवाईला ठोस रूप येईल. त्यामुळे सर्व विभागांनी एकत्रित येऊन कारवाई करावी. पोलिसांनी बनावट वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, असे आदेश दिले. यांची होणार तपासणी४पॅथॉलॉजी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या माहितीनुसार अक्षरा हॉस्पिटल, अल शिफा क्लिनिक लॅब, आमिना हॉस्पिटल, अथर्व क्लिनिकल लॅब, दर्शन पॅथॉलॉजी लॅब, धनराज पॅथॉलॉजी लॅब, कार्वेकर हॉस्पिटल, मेहता कार्डिक सेंटर, साठे नर्सिंग होम, श्री गणेश लॅब, गणेश लॅब, हेल्थ केअर लॅब, हेल्थ प्लस लॅब, अय्यर आॅर्थाेपेडिक सेंटर, लोटस क्लिनिकल लॅब, न्यू रुबी पॅथॉलॉजी लॅब, नितीन पॅथॉलॉजी लॅब, ओंकार लॅब, ओम लॅब, पद्मावती लॅब, सद्गुरू क्लिनिकल लॅब, सैफी हॉस्पिटल, नवलमल अँड नर्सिंग होम, साईकृपा लॅब, संजीवनी क्लिनिकल लॅब, श्री साई क्लिनिकल लॅब, श्री बालाजी क्लिनिकल लॅब, श्री भागवती क्लिनिकल लॅब, सत्यम पॅथॉलॉजी लॅब, श्री कालिदास पॅथॉलॉजी लॅब, श्री महालक्ष्मी लॅब, संजीवनी हॉस्पिटल, श्री पॅथॉलॉजी लॅब (मंगळवार पेठ), श्री पॅथॉलॉजी लॅब (डी-मार्टजवळ), भाग्यश्री क्लिनिकल लॅब, श्री शिवसंतोषी लॅब, सोलापूर डायबेटीज, सुमित पॅथॉलॉजी लॅब, सन पॅथॉलॉजी लॅब, स्वप्नरूप क्लिनिकल लॅब, अमर पॅथॉलॉजी लॅब, लोकमंगल हॉस्पिटल, श्रीरोरे पॅथॉलॉजी लॅब, डॉ. सचिन मुळे डायबॅटॉलॉजी सेंटर, केअर हॉस्पिटल लॅब, डॉ. कासलीवाल हॉस्पिटल येथील लॅबची तपासणी होणार आहे.
बनावट वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी सोलापूर शहरातील ४८ पॅथॉलॉजी लॅबची तपासणी करणार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 3:56 PM
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एम. डी. पॅथॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त शिक्षण असलेल्या व्यक्तींनाच पॅथॉलॉजी टेस्ट करता येतात. शहरातील ४८ पॅथॉलॉजीमध्ये या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पॅथॉलॉजी संघटनेने कळविले आहे.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या मदतीने महापालिका आरोग्य विभागाने शहरातील ४८ पॅथॉलॉजी तपासणी २०१७-१८ या कालावधीत जिल्ह्यात १३ बोगस डॉक्टर आढळून आले कायदे व नियम यांची माहिती घेऊन तातडीने यासंदर्भात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश