शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

सतत सीमकार्ड बदलत पोलिसांना चकवा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने कारवाई करीत भोंदूबाबा मनोहरमामा भोसले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने कारवाई करीत भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यास सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सालपे गावी जेरबंद केले.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ट पथक नेमण्यात आले होते. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींचा पथकाने तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार मनोहरमामा भोसले याचा तो वापरत असलेल्या मोबाइलवरून माग काढण्यात आला. त्यात तो सतत कार्ड बदलत होता. गुुरुवारी (दि ९) रात्रीच त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर फलटण तालुक्यातील सालपे गावातील फार्महाऊसवर पथकातील पोलीस पोहचले. हे फार्महाऊस एका डोंगरावर निवांत ठिकाणी आहे. पोलीस पोहचले तेव्हा मामा भोसले एका खुर्चीवर निवांत बसला होता. यावेळी तो मोबाइलवर बोलण्यात व्यस्त होता. पोलीस या ठिकाणी खासगी वाहनातून पोहचले. पोलिसांना पाहताच मनोहरमामाला धक्काच बसला. पोलिसांनी दाखल गुन्ह्याची माहिती देत कारवाईची माहिती दिली. त्यावर ‘चला येतो’ म्हणत तो पोलिसांबरोबर गाडीत बसून बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग प्रमुख नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार विजय कांचन, अजय घुले, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी ही कारवाई केली.