पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळानिमित्त रायगडावर डिस्को लाईट केली आहे. अशा विद्युत रोषणाईने रायगडाचे पावित्र्य राहत नाही. त्यामुळे खा. संभाजीराजे संभाजी यांनी आक्रमक होत छत्रपतींचा राज्य अभिषेक सोहळा आहे कोणाचं लग्न नव्हे अशा संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंढरपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त खा. संभाजीराजे छत्रपती आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, रायगडावर पुरातत्व खात्याच्या सूचनेने चुकीच्या पद्धतीने विद्युत रोषणाई केली आहे. माझा पुरातत्व खात्यावर आक्षेप होता. यामुळे काळा दिवस हा शब्द पुरातत्व खात्यासाठी उद्देशून बोललो होतो. मी पुरातत्व खात्याला धारेवर धरले. परंतू खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीचा अर्थ घेऊन माझ्यावर टीका केली आहे. मला राजकीय टॅग लावलेले चालणार नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती बद्दल कोणी मला शिकवू नये. मला किल्ले रायगड वरून राजकीय बोट दाखवले तर सहन होणार नाही. माझ्यावर कोणी राजकीय टीका केली तर गाठ माझ्याशी आहे. परंतु सामान्य नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण दिले असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.