सोलापूर : सोलापूर शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला २९९ कोटी रूपयांचा निधी वितरित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर महापालिकेच्या पदाधिकाºयांना दिले़.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी आढावा बैठकीसाठी आज सोलापूर दौºयावर आहेत़ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर महानगपालिकेच्या कामासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
सोलापूरचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या दुहेरी जलवहिनीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव आॅक्टोबरअखेर तयार करावा, त्यानंतर संपूर्ण निविदा प्रक्रिया नोव्हेंबरअखेर निविदा पूर्ण करून कामाला सुरूवात करावी अशाही सुचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासन, जीवन प्राधिकरण विभागाच्या दिल्या.