सोलापूर : घरात बसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना कंटाळा तर आला नसेल ना. खरं तर आमचं त्यांना आव्हान आहे, त्यांनी घराबाहेर पडावं आणि मर्दाप्रमाणे आमच्याशी लढावं. नोटीस पाठविणं हे मर्दाचं काम नाही असे खुलं आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना दिले आहे.
आ. नितेश राणे हे आपल्या कुटुंबियांसह सोमवारी तुळजापूरला दर्शनासाठी सोलापूर विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही, ती दाऊदची बी टीम झालीय. हिंदुत्व सोडलंय म्हणून ते अजाणची स्पर्धा घेतात. जनाब बाळासाहेब हे सेनेच्या बॅनरवर शिवसेनेनचं लिहिलं आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. त्याला की महत्व द्यायचं ठरवून घेतलंय. त्यानंतर पत्रकारांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाविषयी विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना हिंदूंविषयी द्वेष आहे तीच लोकं काश्मीर फाईल्सच्या विरोधात बोलताहेत असेही ते म्हणाले. यावेळी त्याच्यासमवेत सोलापुरातील राणे समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.