पंढरपूर (जि. सोलापूर) : आषाढी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २२ जुलै रोजी पंढरपूरला येणार आहेत़ सरकार विरोधात आंदोलन करून महापूजा रोखण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, मनसे शेतकरी सेना, विश्व वारकरी सेना, संभाजी ब्रिगेड, महर्षी वाल्मिकी कोळी संघटना, शरद क्रीडा प्रतिष्ठान यासह अन्य संघटनांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलीस ठाणे आदी ठिकाणी दिले आहेत़एफआरपी थकविलेले साखर कारखाने व त्या कारखान्याचे चेअरमन, संचालकांवर फौजदार गुन्हे दाखल करावेत़ ९६५ महामार्ग अंतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतकºयांना समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य तो मोबदला देण्यात यावा़जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांवर कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही ठिकाणी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे़मनसे शेतकरी सेनेने बँकांकडून शेतकºयांना पीककर्ज, शासकीय अनुदान विमा, शेतीपूरक कर्ज संदर्भात वारंवार हेलपाटे मारावे लागतात़ कर्ज देण्यासाठी बँकांकडून अडवणूक होते़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कर्जपुरवठा करण्याबाबत बँकांना आदेश द्यावेत़, या मागण्या केल्या आहेत़५० वर्षांपूर्वीचे पुरावे असूनही आम्हाला जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीत. कामावरुन कमी केलेल्या कर्मचाºयांना कामावर घेतले जात नाही, यामुळे हजारो कोळी जमातीच्या शासकीय नोकरदारांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे एकादशी दिवशी मुख्यमंत्री जेव्हा विठ्ठलाची महापूजा करत असतील, तेव्हा आम्ही ‘जलसमाधी’ घेऊ, असा इशारा महर्षी वाल्मिकी सेनेने दिला आहे.>मंदिर समिती बरखास्त कराश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले हे परस्पर कोणतेही निर्णय घेऊन मोकळे होतात़ ते पंढरपूरला येत नाहीत़ त्यामुळे मंदिर समिती बरखास्त करावी, अशी मागणी वारकरी सेनेने केली असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मराठा समाज आक्रमक़़़मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजाने एकजुटीची वज्रमुठ पुन्हा आवळली आहे. मुंबईसह राज्यभरात झालेल्या ५८ मोर्चानंतर, तुळजापूर येथे झालेल्या जागर गोंधळ आंदोलनानंतर पुढील दिशा ठरविणेसाठी सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक पंढरपुरात होत आहे़
मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 6:04 AM