माळशिरस : सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माळशिरस पंचायत समितीला भेट देऊन दफ्तराची तपासणी केली. जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी प्रथमच तालुक्याचा दौरा केला. यावेळी पंचायत समिती सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सदस्य अजय सकट, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सहगटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी शंभर टक्के पूर्ण करणे, अंगणवाडी शाळा नळजोडणी करणे यासह विविध कामांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शंकर नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत वृक्षारोपण केले तसेच अकलूज ग्रामपंचायतीच्या विविध कामांचा आढावा घेतला.
घरकुल व मनरेगावर समाधान
महाआवास योजनेंतर्गत फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त घरकुले बांधली जावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर बागेचीवाडी येथील घरकुलाला भेट दिली. माळशिरस पंचायत समितीने घरकुल व मनरेगांतर्गत केलेल्या कामासंदर्भात समाधान व्यक्त केले.
फोटो ::::::::::::::
शंकर नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील व अन्य उपस्थित होते.