शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक शुल्कासाठी मिळणार दहा हजार, जूनअखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत

By appasaheb.patil | Published: June 08, 2023 4:00 PM

या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे.

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई अथवा वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी बालनिधी प्राप्त झालेला आहे. या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, लाभार्थ्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने कळविले आहे. अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाइड, आई-वडील कोविड पॉझिटिव्ह असल्या-बाबतचा पुरावा, झेरॉक्स प्रत, आई-वडील मृत्यू दाखला झेरॉक्स प्रत, ज्या शाळेत प्रवेश घेतला आहे, त्या शाळेच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, बालकाचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत अशी कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहेत. तसेच, शाळेचा फी पडताळणीचा अर्ज लाभार्थींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून सदर अर्ज शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून स्वाक्षरी करून कार्यालयात वर नमूद कागदपत्रांसह प्रस्ताव कार्यालयात जमा करावा असेही कळविले आहे. अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, शोभानगर, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या