सोलापूर : यंदा गौरी गणपतीची आरास सोलापुरकरांच्या निर्मितीतील प्लास्टीक फुलांनीच होईल. कोरोना काळात शहरात अनेक ठिकाणच्या गृहिणींनी कृत्रीम फुलांच्या निर्मीतीचे धडे गिरवले अन या फुलांना लागणारा ९० टक्के 'रॉ मटेरियल' चीनमधून येणे थांबले आहे. याचा परिणाम यंदाच्या गौरीगणपतीच्या काळात दिसून येतोय.
कोरोना काळात सोलापुरात अनेक गृहिणींनी प्लास्टीक फुलांच्या निर्मितीचे धडे गिरवले. त्यांच्या कौशल्यातून साकारलेली प्लास्टीक फुलं ही शहरातील अनेक भागात तयार होतायत. यंदा सोलापुरी कुत्रीम फुलांना मागणी असल्याचे व्यवसायिकातून सांगितले जाते. बाजारात प्लास्टीकची २०० प्रकारची फुलं आली असून पंढरपूरसह लातूर, नांदेडसह कर्नाटकात जाताहेत.
ही फुलं हुबेहुब झेंडू, गुलाब जाणवतात. २० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंतची किमती आहेत.कोरोना काळात फावल्या वेळेत अनेक महिलांनी प्लॅस्टीकपासून फुलं बनवण्याची कला अवगत केली. आवडीचं रुपांतर कलेत आणि कलेचं रुपांतर कौशल्यात झाल्याचे सोलापुरातील व्यापा-यातून सांगण्यात येते. लागणारे रॉ मटेरियल चीन ऐवजी बहुतांश मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता येथील बाजार पेठेतून उपलब्ध होत आहे.