शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

बार्शीतल्या थिएटर्सचा पितामह चित्रा टॉकीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:48 AM

चित्रा टॉकीजने अनेक सुपरहिट चित्रपट बार्शीकरांना दाखविले. १९४३ साली प्रदर्शित झालेला रामराज्य चित्रामधला पहिला चित्रपट. प्रारंभीच्या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित ...

चित्रा टॉकीजने अनेक सुपरहिट चित्रपट बार्शीकरांना दाखविले. १९४३ साली प्रदर्शित झालेला रामराज्य चित्रामधला पहिला चित्रपट. प्रारंभीच्या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या मूकपटांच्या पार्श्व संगीतामध्ये अस्सलपणा होता. सनई, हात पेटी, तबला वाद्य घेऊन वादक पडद्यामागे बसायचे. संपूर्ण चित्रपटाची मदार त्यांच्यावर असायची.

१९९२ साली भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन अर्जुनराव बारबोले यांनी हे थिएटर करंदीकर यांच्याकडून विकत घेतले. त्यांचे पुत्र विश्वासराव बारबोले यांनी या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसताना अतिशय जिद्दीने हे चित्रपटगृह चालवले. त्यांनी चित्रपटगृह अंतर्गत विविध सुधारणा घडवून आणल्या, परिसराचे सुशोभीकरण केले. सुरुवातीपासूनची रोलवर चित्रपट दाखवण्याची पद्धत बंद केली. २००६ साली यूएफओ डिजिटल हे तंत्रज्ञान आणले.

अनेक आठवडे चालायचे चित्रपट...

या चित्रपटगृहात १९८० सालापासून व्यवस्थापक म्हणून काम करणारे प्रकाश माने यांनी चित्राचा सुवर्णकाळ पाहिला आहे. बार्शीतील प्रेक्षक हे खरंच चित्रपट वेडे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. येथील चित्रपट रसिकांमध्ये महिलांचे प्रमाणही जास्त होते. १९८८ साली अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट १५ आठवडे चालला. त्यानंतर १९८९ साली मैने प्यार किया हिंदी चित्रपट १६ आठवडे चालला. त्यानंतर राष्ट्रप्रेम संकल्पनेवर आधारित गदर आणि इंडियन हे चित्रपट हाऊसफुल्ल झाले.

शादी मे जरुर आना ठरला शेवटचा चित्रपट

२०१७ मध्ये शादी मे जरूर आना या चित्रपटानंतर हे चित्रा टॉकीज बंद झाले. थिएटर बंद करण्याची कारणे सांगताना बारबोले म्हणाले, इंटरनेटवर चित्रपट पाहण्याचे फॅड वाढले, घरांमध्ये चॅनलवर चित्रपट पाहण्याची सवय प्रेक्षकांना झाली. मालिकांची संख्या वाढली. घरात बसूनच वेगवेगळे नवीन चित्रपट पाहायला मिळतात म्हटल्यावर थिएटरला कशाला जायचे अशी प्रेक्षकांची मनस्थिती झाली. यामुळे प्रेक्षक चित्रपटापासून दुरावले. शेवटी नाईलाजाने अगदी हतबल होऊन थिएटर बंद करावे लागले; मात्र जुन्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या उद्योगात सामावून घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.