यात सुनील विलास सालगुडे (वय २५, रा. सालसे, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी गुन्हा नोंदला आहे.
ठरल्याप्रमाणे आई-वडील तीन दिवसांपूर्वी लक्ष्मण हांडे यांच्या शेतामध्ये उडीद काढण्यासाठी गेले होते. शुक्रवारीही फिर्यादी सुनील सालगुडे याच्या शेतातील उडीद काढण्याचे काम सुरू होते. मात्र ठरल्याप्रमाणे लक्ष्मण हांडे व त्यांची पत्नी वैशाली हांडे हे शेतामध्ये उडीद काढण्यासाठी आले नाहीत. त्यांचा मुलगा शिवाजी लक्ष्मण हांडे हा शेतात उडीद काढण्यासाठी आला होता. त्या वेळी आण्णासाहेब याने त्यास तुझे आई-वडील ठरल्याप्रमाणे आमच्या शेतात उडीद काढण्यासाठी का आले नाहीत? अशी विचारणा केली. यावर तो रागाने घरी निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सालसे येथील शेतातील राहते वस्तीवर येत असताना भाऊ आण्णासाहेब शेतातील काम आटोपून शेतातील घरी येत असताना तो लक्ष्मण ज्योतिराम हांडे, शिवाजी लक्ष्मण हांडे आणि वैशाली लक्ष्मण हांडे (सर्व रा. सालसे ) हे आण्णासाहेब उभा असलेल्या ठिकाणी आले.
तेव्हा तुमच्या शेतात उडीद काढायला येणार नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणून आण्णासाहेब याला हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून लक्ष्मणने त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने मारून जखमी केले. तिघांनी आम्हाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीला उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.