सोलापूर : अमृत भारत स्कीम अंतर्गत रेल्वे स्थानकाचे नाव या योजनेत आले आहे. या योजने अंतर्गत रेल्वे स्टेशनमध्ये डेव्हलपमेंटचे काम सुरु झाले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे पोलिस चौकी रविवारी जमिनदोस्त करण्यात आली. ही चौकी जवळपास साठ वर्षापासून तेथे होती, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
अमृत भारत योजने अंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचे आधुनिकरण केले जाणार आहे. यात सोलापूर रेल्वे स्थानकाचे नाव आहे. शिवाय या अंतर्गत जिल्ह्यातील तीन रेल्वे स्टेशनचा ही सहभाग आहे. या अंतर्गत नुतनीकरण करण्यात येत आहे. यानुसार रविवारी सोलापूर स्थानका समोरील गांधी चौक ठिकाणी जवळपास ६० वर्षांपूर्वी तयार कण्यात आलेली जुनी सिटी पुलिस चौकी पाडण्यात आली. ही चौकी रेल्वे स्टेशनच्या प्रवेश व्दारासमाेरच होती. ही चौकीत मागील काही वर्षांपासून बंद स्थितीत होती.त्या ठिकाणी आता नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. ही इमारत आधुनिक असणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. याचे काम ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.