सोलापूर : दहा ते बारा दिवसांवर आलेल्या नाताळनिमित्त उमेदपूर ख्राईस्ट चर्च च्या वतीने सर्व बांधवांच्या घरोघरी कॅरल सिंगिंग करण्यात येत आहे. घरोघरी येशू ख्रिस्त जन्माची सुवार्ता देऊन नाताळ जवळ आल्याचे संदेश याद्वारे देण्यात येते.
येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर विविध ठिकाणी चर्चची स्थापना झाली. तेव्हापासून म्हणजेच इसवी सनाच्या सुरुवातीपासून त्यांची जन्मगीते गाऊन आनंद व्यक्त करण्याची परंपरा सुरू झाली. त्याला दोन हजार एकवीस वर्षांचा इतिहास असून, त्याच पार्श्वभूमीवर शहरातील जवळपास पन्नास चर्चच्या माध्यमातून हे सिंगीग चालते. यामध्ये ख्रिस्त जन्माच्या संदर्भातील गाणी म्हटली जातात. नाताळच्या वीस ते पंचवीस दिवस आधीपासून शहरातील सर्व बांधवांच्या घरी नाताळ गीते गाऊन आनंद व्यक्त करण्यात येतो. रेव्हरंट विकास रणसिंगे, सियोना रणसिंगे यांच्या उपस्थितीत उमेदपूर चर्चच्या महिला मंडळाच्या वतीने सैफुल येथील पापाराम नगरातील कमल बॅस्टीन यांच्या घरी सुनीता जाधव, आशा गुंजे, स्मिता जाधव, वंदना गुंजे, रीना जाधव, प्रियांका गुंजे, एरोन बॅस्टीन या समूहाने नाताळ गीते गाऊन आनंद व्यक्त केला. रिनी जोएल बॅस्टीन यांनी गिटारची साथ दिली. दररोज पाच ते सहा ठिकाणी या मंडळाच्या वतीने सिंगिंग होते.
----------
येशूमसी देता खुशी...
आला परमेश्वर आला, जगी तारक जन्मा आला चला पाहू त्याला, पाहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, येशूमसी देता खुशी, राजा येशू आला आला, येशू तेरा नाम सबसे उंचा यांसारखी गाणी गायली जात आहेत. रेव्हरंट विकास रणसिंगे, सियोना रणसिंगे यांच्या उपस्थितीत उमेदपूर चर्चच्या महिला मंडळाच्या वतीने सैफुल येथील पापाराम नगरातील कमल बॅस्टीन यांच्या घरी सुनीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आशा गुंजे, स्मिता जाधव, वंदना गुंजे, रीना जाधव, प्रियांका गुंजे, एरोन बॅस्टीन, या समूहाने नाताळ गीते गाऊन आनंद व्यक्त केला. रिनी जोएल बॅस्टीन यांनी गिटारची साथ दिली.
--------
जन्म आणि स्तुतीपर गाणी...
एका ग्रुपच्या वतीने दररोज पाच ते सहा ठिकाणी सिंगिंग होते, ते नाताळपर्यंत चालते. विविध चर्चचे युवक, युवती, महिला आणि सामान्य असे पंधरा ते वीस ग्रुप शहरात असून, गिटार, झंज, पोंगो, ट्रिपल सेट, फ्लुएट या वाद्याच्या साथीने टाळ्या वाजवित उंच स्वरात प्रभूंच्या जन्म आणि स्तुतीपर गाणी म्हटली जातात. नाताळपर्यंत दररोज सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत हा कार्यक्रम चालतो.