सोलापूर : इमेलवरील फेक आदेशामुळे चक्क राज्यातील अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात पदोन्नतीने आएएस झालेल्या अधिकाºयांची यादी दुरूस्ती केल्याचा दुसºया दिवशीच्या तारखेचा हुबेहुब हा आदेश असल्याने अधिकारी चक्रावून गेले आहेत.
भारत सरकारच्या पब्लिक ग्रीव्हन्सेस प्रशिक्षण विभागाने ३ सप्टेंबर रोजी खात्यांतर्गत पदोन्नतीने आयएएस अधिकाºयांची यादी जाहीर केली. पदोन्नतीच्या प्रतिक्षेत ७५ जण होते. सेवा ज्येष्ठतेप्रमाणे २३ अधिकाºयांची निवड भारत सरकारचे सचिव पंकज गंगवार यांनी जाहीर केली होती. पब्लिक गॅझेटमध्ये पदोन्नतीची यादी प्रसिद्ध झाली. यावर अन्याय झालेल्या काही अधिकाºयांनी आक्षेप घेतला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. वायचळ यांचे नाव सेवा ज्येष्ठता यादीत पहिले असताना त्यांना अनफिट दाखविण्यात आले. तर त्याखालोखाल जे. टी. पाटील यांचे नाव दाखविताना १ ए असा अग्रक्रमांक घालण्यात आला होता. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेची यादी ७६ जणांची असताना आकडेवारीत ७५ जण दाखविण्यात आले अन फायनल यादी २५जणांची जाहीर करण्यात आली तेव्हा वायचळ व पाटील यांची नावे वगळण्यात आली व पदोन्नतीच्या यादीत यु. ए. जाधव हे पहिल्या क्रमांकावर आले.. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याचे सांगण्यात आले.
या गोंधळामुळे ही यादी चर्चेत असतानाच ४ सप्टेंबरचा एक आदेश इमेलवर फिरत आहे. यामध्ये आयएएस पदोन्नतीत जे. टी. पाटील यांचे नाव एक नंबरवर दाखविण्यात आले आहे. मूळ यादी २३ जणांची असताना यात २५ जणांची नावे आहेत. सचिव गंगवार यांच्या हुबेहुब स्वाक्षरीने प्रसारीत करण्यात आलेले आएएसचे पदोन्नतीचे हे नोटीफिकेशन सुधारीत की बनावट यावरून अधिकाºयांमध्ये गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे या नोटीफिकेशनच्या कोपºयावर पेन्सिलने इंग्रजी आद्यक्षरात राँग असे लिहिले आहे. त्यामुळे अधिकाºयांनी या इमेलबाबत एकमेकांना विचारणा केली व हा फेक इमेल असल्याचे स्पष्ट होताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पण भारत सरकारच्या सचिवाचा सहीने बनावट आदेश प्रसारीत होतो ही बाब गंभीर असल्याचे अनेक अधिकाºयांचे म्हणणे आहे.
आएएसच्या सेवा ज्येष्ठता यादीत माझे पहिले नाव असताना अनफिट दाखवून नाव वगळण्यात आले. यामुळे मी याबाबत भारत सरकारच्या सचिवाकडे पाठपुरावा करीत आहे. अशात मलाही असा फेक इमेल आला. खातरजमा केल्यावर तो बनावट असल्याचे समजले.- प्रकाश वायचळ, मुख्य कार्यकारी अधिकारी