अमित सोमवंशी सोलापूर दि ५ : सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, याचा वापर ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यामुळे आता त्यांच्या पोलीस ठाण्यातील हेलपाटे कमी झाले. आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-तक्रार केंद्रात तीन महिन्यात ग्रामीण भागातील ५६ आॅनलाईन तक्रारी आल्या. त्याचा निपपोटारा ग्रामीण पोलिसांनी केला.महाराष्ट्र पोलीस सी.सी.टी.एन.एस. प्रकल्पांतर्गत नागरिकांकरिता आॅनलाईन सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाबाबत महत्त्वाची माहिती ही एका क्लिवर सिटीझन पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच पोर्टलवर कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा (एफआयआर), हरविलेली मालमत्ता, चोरीस गेलेले वाहन, अनोळखी मृतदेह, बाबतची माहिती. तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत घेण्यात येणारे उत्सव याकरिता सिटीझन पोर्टलद्वारे आॅनलाईन परवानगीकरिता अर्ज करण्याची सुविधा पुरविण्यात आलेली आहे.सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष सर्व पोलीस ठाण्याशी इंटरनेटद्वारे जोडण्यात आले आहेत. तीन महिन्यात ५६ आॅनलाईन तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या. त्या तक्रारींची ई-तक्रार केंद्रामधून आॅनलाईन नोंदवून संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्याची चौकशी करुन तपास करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कर्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.----------------------------तीन हजार जणांनी केले मोबाईल अॅप डाऊनलोड- सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आपत्कालीन तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी पीडित नागरिकांना विशेषत : महिला व युवतींना तत्काळ पोलिसांची मदत मिळण्याकरिता मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले होते. हा अॅप तीन हजार नागरिकांनी डाऊनलोड केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.---------------तात्काळ डिजिटल प्रतआॅनलाईन तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यास त्याची तक्रार ई-तक्रार केंद्रामधून आॅनलाईन नोंदवून संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्याची चौकशी व तपास करण्यात येते. त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करण्यासाठी पाऊले उचलतात़ तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास त्याच्या ई-मेल आयडीवर हरवलेल्या वस्तू, साहित्य, कागदपत्रे यांची डिजिटल सिग्नेचरची प्रत तत्काळ प्राप्त होते़
सिटीझन पोर्टलचा ग्रामीण भागातही उत्तम वापर, सोलापूरकरांचे पोलिसांकडील हेलपाटे टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:05 PM
सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, याचा वापर ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीस सी.सी.टी.एन.एस. प्रकल्पांतर्गत नागरिकांकरिता आॅनलाईन सुविधा पुरविण्यात आल्यानागरिकांना त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाबाबत महत्त्वाची माहिती ही एका क्लिवर सिटीझन पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेई-तक्रार केंद्रात तीन महिन्यात ग्रामीण भागातील ५६ आॅनलाईन तक्रारी आल्या, त्याचा निपपोटारा ग्रामीण पोलिसांनी केला.