शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

शहर नको गाव बरा माझी कवठ्याची झेडपी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 10:11 AM

आयएसओ मानांकन प्राप्त शाळा : हसत-खेळत शिकताहेत चिमुकले; तालुका-जिल्हास्तरावर विविधांगी प्रगती

ठळक मुद्देसोलापूर शहरापासून जवळ शाळा.. तरीही एकही विद्यार्थी शहराल्या शाळेत नाही कवठे (ता. उत्तर सोलापूर) झेडपी शाळेची ही ओळख सर्वदूर पसरली आनंददायी शिक्षण पद्धतीमुळे दररोज ९५ टक्क्यांच्यावर उपस्थिती दिसून येते

सोलापूर : शहरापासून जवळ शाळा.. तरीही एकही विद्यार्थी शहराल्या शाळेत नाही. याचं कारण इथली शिक्षण पद्धती, त्यांच्यावर होणारे संस्कार आणि मुलांचा वाढलेला बुद्ध्यांक. ग्रामस्थांची शाळेबद्दल असलेली आपुलकी, यामुळेच अल्पावधीत शाळेनं आयएसओ मानांकन प्राप्त केलंय. स्पर्धा कोणतीही असो, इथले विद्यार्थी हमखास चमकतात. कवठे (ता. उत्तर सोलापूर) झेडपी शाळेची ही ओळख सर्वदूर पसरली आहे.

शिक्षणाच्या प्रवाहात मुलं रहावीत, त्यांना गोडी लागावी, यासाठी लोकसहभागातून परिसर रमणीय राहावा, यासाठी परिश्रम घेतल्याचे शाळेत प्रवेश करतानाच याची प्रचिती येते. आनंददायी शिक्षण पद्धतीमुळे दररोज ९५ टक्क्यांच्यावर उपस्थिती दिसून येते. यासाठी उपस्थितीध्वज उपक्रम दररोज राबवला जातो.

संगीतमय पाढे, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अध्ययन, गटपद्धतीनुसार वर्गरचना, अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे वाढदिवस, १०० टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शालेय पोषण आहारासाठी लागणाºया पालेभाज्या पिकवणारी परसबाग अशा विधायक उपक्रमांस शाळा व्यवस्थापन कमिटीचा सदैव पुढाकार असल्याचं दिसून आलं. 

पहिली ते सातवीसाठी आठ शिक्षक अध्यापनासाठी कार्यरत आहेत. सामूहिक प्रयत्नामुळे शाळेनं आजवर तालुका, जिल्हास्तरावर आदर्श शाळा, वृक्षमित्र, आचार्य दोंदे उत्कृष्ट शाळा, स्काऊट-गाईड जिल्हास्तर अशी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र, सौरऊर्जा सोलर सिस्टीम, डिजिटल तंत्रज्ञानासाठी संगणक कक्ष अशा भौतिक सुविधांद्वारे मुलं घडवण्याचं काम    इथं नेटाने सुरू आहे़

शहरालगतची पण आपलं वेगळं अस्तित्व या शाळेनं टिकवलं आहे. विविध उपक्रमांमुळे शाळेनं आयएसओ मानांकन प्राप्त केले. यामुळे इथल्या पालकांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच घेण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरीय उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेणारी शाळा म्हणून ओळख. म्हणूनच इथल्या मुलांनी टॅलेंट हंटसारख्या स्पर्धा तसेच तालुका, जिल्हास्तरावर अनेक पारितोषिके पटकावली आहेत. मुलांची एकाग्रता टिकावी यासाठी विपश्यना व आनापान क्रिया घेतली जाते. यामुळे मुलं बहुश्रुत होतात, यावर पालकांना विश्वास आहे.

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पालकांचा उत्साही सहभाग, शिक्षण विभागाकडून प्रोत्साहन यामुळे नवोपक्रम राबवण्यात येतात. मुलांना अध्यापनाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यावर भर दिला जातो.  -कल्पना लालबोंद्रे,  मुख्याध्यापक 

आमचं गाव शहरापासून जवळ असूनही इथल्या शाळेत मुलांना दिले जाणारे संस्कार शिक्षण यामुळे आम्ही आमची मुलांना चांगले शिक्षण मिळतेय म्हणून शहरातल्या शाळेत पाठवत नाही.-ब्रह्मदेव लोखंडे, पालक

लोकसहभागातून शैक्षणिक उठावविद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षक अध्यापन करत असताना लोकसहभागातून या शाळेत शैक्षणिक उठाव होण्यास मदत झाली आहे. नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र, सुसज्ज ग्रंथालय असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण