शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

शहराला पाण्याची गरज १७० दशलक्ष लिटर्स

By admin | Published: May 08, 2014 8:53 PM

निम्म्या पाण्याचा तुटवडा: वर्षभरात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन

निम्म्या पाण्याचा तुटवडा: वर्षभरात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन सोलापूर: सोलापूर शहराची सध्याची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी १३५ लिटर्स या मानकाप्रमाणे पाणी देण्यासाठी १७० ते १७५ एमएलडी (दशलक्ष लिटर्स) एवढ्या पाण्याची गरज आहे; मात्र उजनी जलवाहिनी, टाकळी जलवाहिनी आणि हिप्परगा योजना याचा विचार करता अवघा ११० दशलक्ष लिटर्स पाणी उपसा केला जातो़ यातील एअर वॉल्व्हमधील गळत्या तसेच इतर गळत्या विचार करता दररोज ७५ एमएलडी पाणी देखील मिळत नाही़ त्यामुळे शहरात पाण्याचा तुडवडा असून अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे मनपा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे़महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना तसेच मनपा पदाधिकार्‍यांना पाणीपुरवठ्याबद्दल वस्तुस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे़ शहराची सध्याची लोकसंख्या १० लाख ७५ हजार असून या लोकसंख्येसाठी प्रतिमाणसी १३५ लिटर्सप्रमाणे पाणी देण्यासाठी १७५ दशलक्ष लिटर्स पाणी आवश्यकता आहे़ एकरुख तलाव ही योजना १९३२ साली सुरू झाली असून ती २७ दशलक्ष लिटर्सची असली तरी तलावात पाणी नसणे, यंत्रणा जुनी होणे यामुळे फक्त ५ एमएलडी पाणी येथून घेतले जाते़ टाकळी योजना (भीमानदीवरुन) १९६५ साली सुरू केली असून ती १०८ एमएलडीची असली तरी तीचे आयुष्य संपले आहे़ वारंवार गळत्या होतात त्यामुळे येथून अवघे ५५ एमएलडी पाणी उचलले जाते़उजनी ते सोलापूर या १०० किमीची जलवाहिनी १९९७ साली कार्यान्वित झाली़ तिची क्षमता ८० एमएलडी असून चिंचोळी एमआयडीसीला १० एमएलडी पाणी देण्याचा करार झाला आहे़ ३५० ठिकाणच्या एअर वॉल्व्हमधून हायवेवरील नागरिक वारंवार पाणी घेतात, काही ठिकाणी गळत्या आहेत त्यामुळे या जलवाहिनीतून ५५ एमएलडी पाणी येते़त्यामुळे तीनही उद्भवातून ११० ते ११५ एमएलडी पाणी उचलले जात असले तरी गळत्यांचा विचार करता शहरात अवघे ७५ एमएलडी पाणी येते़ उन्हाळ्यातील वाढलेली मागणी यामुळेही पाणी कमी पडत आहे़ शहरात ३३४७ सार्वजनिक बोअरच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा सुरू आहे़ १३८ ठिकाणी बोअरवर विद्युतपंप बसवून पाणीपुरवठा सुरू आहे़ नव्याने २१० ठिकाणी बोअर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ ---------------------------टाकळी ते सोलापूर ही १९६५ साली कार्यान्वित झालेली योजना जुनी झाली असून तीचे आयुष्य संपले आहे़ त्यामुळे गळत्या वाढल्या आहेत़ यासाठी नवीन समांतर जलवाहिनी टाकण्याचा १६७ कोटींचा प्रस्ताव मनपा सभेपुढे सादर केला आहे़ वर्षभरात हे काम करण्याचे आयुक्तांचे नियोजन आहे़-उजनी-सोलापूर ही १०० किमी लांबीची जलवाहिनी १९९७ साली सुरू झाली़ यावर ३५० एअर वॉल्व्ह असून हायवेवरील नागरिकांकडून या वॉल्व्हमधून गळती केली जाते़ उन्हाळ्यात हे प्रकार वाढतात़ या जलवाहिनीला देखील अनेक ठिकाणी गळत्या आहेत़ १८ मोठ्या गळत्या नुकत्यात बंद केल्या आहेत़-युआयडीएसएसएमटीतून १०० कोटी खर्चून १७ टाक्या बांधल्या आहेत़ ४४ किमी ट्रान्समिशन तर १७१ किमी वितरण नलिका टाकली आहे़ यातील ६० किमी लाईन सुरू झाली आहे़ वर्षभरात नव्याने सहा हजार कनेक्शन दिले आहेत़-पाणीपुरवठा सुधारण्याकामी आयुक्तांनी आपल्या अधिकारात १८ ठिकाणी जलवाहिनी व पाणीपुरवठ्याचे काम केले असून त्यावर २ कोटी ६६ लाखांचा खर्च झाला आहे़ ज्या भागात जलवाहिनीच नव्हती अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे़-------------------------------२८ टँकरने पाणीपुरवठामहापालिकेच्या मालकीच्या आठही झोन कार्यालयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे आठ पाण्याचे टँकर आहेत़ शिवाय खासगी २१ टँकर आहेत, त्यामुळे शहरात ज्या भागात पाणी येत नाही अशा भागात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असून दररोज १२५ ते १५० खेपा याद्वारे केल्या जातात़ पाणीपुरवठा सुधारण्याकामी ३० इंजिनिअरची स्टोअरमध्ये नियुक्ती केली आहे़