सोलापूर : शासकीय रुग्णालयातील कर्मचाºयांना व काही डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने आतमध्ये असलेली सिव्हिल पोलीस चौकीही बंद करण्यात आली आहे. जखमींची नोंद आता थेट पोलीस ठाण्यात होत असून, पहिल्यांदाच चौकीला कुलूप लागल्याचे दिसून येत आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीवर उपचार करणाºया काही डॉक्टर्स, नर्स, ब्रदर व अन्य कर्मचाºयांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दाखल होणाºया रुग्णांची माहिती घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात सिव्हिल पोलीस चौकी आहे. सिव्हिल पोलीस चौकीत दोन पाळ्यांमध्ये चार पोलीस कर्मचारी कार्यरत असतात. अपघात, जळीत, मारहाणीतील जखमी, आत्महत्या, आजाराने मृत्यू अशा कोणत्याही प्रकारचे रुग्ण, रुग्णालयात दाखल झाले की त्याची रितसर नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करावी लागते. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाल्यानंतर त्याची माहिती घटनास्थळ घडलेल्या हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्याला कळवली जाते. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयातील कर्मचाºयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनानेही आपल्या कर्मचाºयाची काळजी म्हणून आतमध्ये असलेली पोलीस चौकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी रात्री १0 वाजता अचानक सिव्हिल पोलीस चौकी बंद करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ सिव्हिल पोलीस चौकी बंद केली आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच पोलीस चौकीला कुलूप लावण्यात आले आहे.
सदर बझार पोलीस ठाण्यात होतील नोंदी : साळुंखे- पोलीस कर्मचाºयांची काळजी म्हणून पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सिव्हिल पोलीस चौकी बंद करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांची नोंद आता थेट सदर बझार पोलीस ठाण्यात केली जाईल. तशा सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या आहेत.
पोलीस कर्मचारी झाले होम क्वारंटाईन- सिव्हिल पोलीस चौकीत दोन पाळ्यांमध्ये चार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.