मंगळवेढा : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल लागला. यामध्ये अवताडे गटाने १२, तर स्व. आमदार भारत भालके गटाने १२ ग्रामपंचायतींचे सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे. आमदार परिचारक गटानेही भालके व अवताडे यांच्या गटातून स्वत:चे उमेदवार निवडून आल्याचे सांगितले. माचणूर ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात अवताडे गटाला यश आले आहे.
अवताडे गटाने कर्जाळ-कात्राळ, माचणूर, सलगर बु., घरनिकी, हुलजंत्ती, तामदर्डी, भोसे, बोराळ, डोणज, कचरेवाडी, गणेशवाडी, अरळी, सिद्धापूर, बालाजीनगर, मल्लेवाडी, आसबेवाडी, लवंगी, तर भालके गटाने लेंडवे चिंचाळे, मल्लेवाडी, भोसे, तांडोर, डोणज, अरळी, आसबेवाडी, लवंगी, मरवडे, तामदर्डी, बोराळे, हुलजंती, बालाजीनगर आदी ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
नंदेश्वर, बोराळे, महमदाबाद (शे) व सिद्धापूर या ग्रामपंचायतींवर परिचारक गटाने दावा केला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, माजी सभापती निर्मला काकडे, तानाजी काकडे, सदस्य रमेश भांजे यांनी आपल्या गावातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.
----
चिठ्ठीद्वारे श्रीकांत चव्हाण विजयी
बालाजीनगर येथील मनीषा पवार व श्रीकांत चव्हाण यांना १५९ मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे श्रीकांत चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले.