शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

पाचवीत शिकणारी सोलापूरची अंतरा नरुटे पोहोचली आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वतावर

By appasaheb.patil | Updated: July 20, 2024 17:46 IST

टांझानियामध्ये असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून १९,३४१ फूट उंच

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: इयत्ता पाचवीत शिकणारी अंतरा नरूटे (वय १०) हिने ही देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आई-वडिलांशिवाय अंतराने प्रवास करीत आफ्रीकेतील टांझानिया येथील किलीमांजारो या सुप्त ज्वालामुखीच्या पर्वतावर अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती प्रथमच पोहोचविली आहे. सोलापूरच्या रेल्वे लाईनजवळ आजोळ असलेल्या अंतरा नरूटे हिच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तांझानिया देशात असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९३४१ फूट) उंच आहे. या देशाच्या ईशान्य भागात पूर्व गोलार्धात ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे. दरम्यान, अंतराने यापूर्वी गोरक्षनाथ गड, रतनगड, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, कळसूबाई शिखर येथे यापूर्वी कु.अंतराने ट्रेकिंग केली आहे. याशिवाय तिने योगा, रोप मल्लखांब, सिल्क मल्लखांबचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतले. अंतराने किलीमांजारो पर्वतावरील चढाई किलिमांजारो नॅशनल पार्कपासून रेनफ़ॉरेस्टमधून सुरवात केली. १० किलोमीटरचे घनदाट जंगलातून हे अंतर अंतर कापण्यास ६ तास लागले. त्यानंतर मंडारा हट ते होरंबो हे १० किलोमीटरचे अंतर कापण्यास ९ तास, तर होरंबो ते किबो हे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ८ तास लागले. उणे १० अंश तापमानात किबो हटपासून वर १८ हजार फूट उंच चढाई पूर्ण केल्यानंतर हवेतील बदलचा व कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणामुळे चढाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतरा हिने भारत देशाचा तिरंगा फडकवत, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती व होमिओपॅथीचे जनक डाॅ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व आफ्रिकन मार्टीन आणि जस्टीन या स्थानिक गाईडच्या मदतीने अंतराने हे यश मिळवले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर