विलास जळकोटकर
सोलापूर: माध्यमिक, उच्च माध्यमिक अर्थात इयत्ता १२ वीची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. शहर आणि जिल्ह्यात एकूण ९६ परीक्षा केंद्रांवर ५३ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. यावर्षी परीक्षेच्या कालावधीत कॉपी शिवाय होणाºया गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १ मार्चपासून सुरु होणाºया माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) साठीही अशाच प्रकारचे नियोजन असणार आहे.
इयत्ता १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. यासाठी झेडपी शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे. यामध्ये एकूण पर्यवेक्षक केंद्र ११ असणार आहेत. शहरात ९ आणि जिल्ह्यात २ केंद्रे असतील. या केंद्रामार्फत प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय शहरामध्ये ३० आणि ग्रामीण भागात ६० असे एकूण ९६ परीक्षा कें द्रांवर ५३ हजार १५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा शांततेत आणि पारदर्शीपणे व्हावी या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. शिवाय शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी, निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ, डाएट प्राचार्य, आणि महिलांचे अशी ७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके शहर-जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देणार आहेत. याशिवाय परीक्षा केंद्रावर स्थानिक पातळीवर ग्रामीण भागात २१० तर शहरी भागात ४५ अशी एकूण २५५ बैठे पथकही कार्र्यरत असणार आहे.
याशिवाय १ मार्चपासून सुरू होणाºया इयत्ता १० वीच्या परीक्षा २२ मार्चपर्यंत चालणार आहेत. यासाठीही अशाच प्रकारचे नियोजन आखले आहे. ग्रामीण भागात १० आणि शहरात ५ अशा १५ पर्यवेक्षक केंद्रांद्वारे १६६ मुख्य परीक्षा केंद्रांवर ६५ हजार ५९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात ग्रामीण भागात १२० तर शहरी भागामध्ये ४६ परीक्षा केंदे्र असणार आहेत. परीक्षार्र्थींची संख्या लक्षात घेता यंदा ग्रामीण भागात ५९० तर शहरांमध्ये १३८ अशा ८२० बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.भरारी पथकांसमवेत परीक्षा केंद्रांच्या आत आणि परिसरात केले जाणारे व्हिडीओ चित्रण हे गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भरारी पथके अन् बैठ्या स्कॉडचे नियोजनदहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शी आणि गैरप्रकाराविना व्हाव्यात यासाठी भरारी पथके, बैठे पथकांद्वारे परीक्षार्र्थींवर अंकुश असणार आहे. परीक्षा केंद्रात अथवा बाहेर गैरप्रकार होताना आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. परीक्षा निर्भयपणे पार पाडाव्यात या दृष्टीने शिक्षण विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने जावे, असा सल्लाही झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला.