आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : समाधानी स्वयंपूर्ण खेडेगांव या योजनेच्या अंतर्गत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हिरज गाव दत्तक घेतलेले आहे़ या गावात गुरूवारी सकाळी सात वाजता सोलापूर तालुका पोलीसांनी स्वच्छता मोहिम राबविली़ यात प्रामुख्याने तालुका पोलीसांनी गावातील धार्मिक स्थळे स्वच्छ करून ४ टन कचरा काढला़ ही मोहिम पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली़ दरम्यान, गुरूवारी सकाळी सात वाजता हिरज गावातील युवक व समाजसेवकांनी पोलीसांच्या मदतीने गावातील जगदंबा मंदीर, मस्जिद परिसर आदी धार्मिक स्थळांची स्वच्छता केली़ याकामी मंदिराचे पुजारी बाळु कुलकर्णी व मस्जिदचे मौलवी महंमद जुबेर यांनी सहकार्य केले़ या स्वच्छता मोहिमेत पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि नाना कदम, पोहेकॉ चवरे, पोकॉ वाडे, शेख, मपोकॉ काटकर, गावचे सरपंच पूर्वा वाघमारे, सविता होळकर, उपसरपंच मनोहर डोंगरे, महादेव जनकले, चंद्रकांत जनकले आदी ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता़ सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने अभिनव उपक्रम अंतर्गत समाधानी स्वयंपूर्ण खेडेगाव या योजनेच्या अंतर्गत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हिरज हे गाव दत्तक घेतलेले आहे़ या गावात पोलीसांनी विविध उपक्रम राबविले़
सोलापूर तालुका पोलीसांनी राबविली स्वच्छता मोहीम, धार्मिक स्थळे केली स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 3:05 PM