पंढरपूर, :- आषाढी एकादशी -वारी सोहळयात वारक-यांना स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिली.
आषाढी एकादशी वारी सोहळ्यासाठीच्या तयारीसाठी आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत तुकाराम भवन येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख यांनी बैठकीत प्रथम संत संस्थान, पालखी सोहळा प्रमुख आणि विविध संघटनांचे म्हणने ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी सांगितले, पंढरपूरात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत जात आहे. मात्र या वाढत्या संक्ष्येने येणा-या भाविकांना सुविधा पुरवझ्यावर शासनाचा भर आहे. त्या अनुषंगाने प्रशासन आणि जिल्हा परिषद यांनी तयारी केली आहे.
पालकमंत्री म्हणाले, पालखी मार्गावरील गावांना दिला जाणारा निधी पंधरा दिवस अगोदर देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आषाढी वारीसाठी पुरेसे वेळेत पाणी सोडले जाईल. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या आवश्यक सूचना दिल्या जातील.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदक्षिणा मार्गावर खडी असणार नाही. चंद्रभागेत आषढीवारीपूर्वी पाणी सोडण्याचा प्रयत्न करु. पंढरपुरला जोडले जाणारे सर्व रस्ते 30 जून पूर्वी सुस्थितीत ठेवण्यासाठी सूचना दिल्या जातील. पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटविले जातील. रस्ते नीट केले जातील, असे सांगितले.
ग्रामपंचायतींना विशेष निधी देण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. पालखी विश्वस्तांनी मांडलेल्या मुद्यांबाबत सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख सुनिल मोरे, कार्यवाह अभिजीत मोरे, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख संजयनाना धोंडगे, श्री संत सोपानकाका पालखी सोहळा प्रमुख गोपाळ गोसावी यांनी आपल्या मागण्या व समस्या मांडल्या.
यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, शमा ढोक-पवार, प्रमोद गायकवाड, तहसिलदार रमा जोशी, बाई माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध आणदूरकर, महावितरणचे मधुकर पडळकर, एस.टीचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदि उपस्थित होते.