लाॅकडाऊन काळात शेतमालाची वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पीकवलेले फळे, भाजीपाल्याला दर नसल्याने शेतात जागेवर सडून गेली होती. नवीन प्रयोग केल्यास यश मिळते, याची खात्री होती. डाळिंब बागेत आंतरपीक म्हणून टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. घरातील सर्व सदस्य एकजुटीने राबलो. त्यामुळे चांगले उत्पादन घेता आहे. कोणत्याही क्षेत्रात कष्ट केले तरी त्याचे निश्चित फळ मिळतेच, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे बोबडे यांनी सांगितले.
साॅफ्टवेअर कंपनी बंद झाली, टमटमने आधार दिला
मुंबईतील सॉफ्टवेअर बनवणाऱ्या चांगल्यापदावर कार्यरत होतो. पॅकेजही चांगले होते. त्यामुळे घरची आर्थिक घडली बसली. पण कोरोना संसर्ग वाढत गेला अन् लॉकडाऊन झाले. गावाकडे आलो. शेतीत तूर, सोयाबीनसारखी पिके घेतली, पण अतिवृष्टीने नुकसान झाले. काय करावे समजेना. शेतात मन रमेना, पण एक टमटम खरेदी केले. स्वत: चालक होऊन वाळूज ते बार्शी मालवाहतूक सुरू केली. त्यातून चार पैसे मिळत गेले अन् विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसली. सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी बंद झाली तरी टमटमने आधार दिल्याचे वाळूजचे अभिजित मोटे यांनी सांगितले.