खर्डी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लाऊड क्लिनिक मशीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकाचवेळी २३ टेस्ट होणार आहेत. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसविण्यात आले आहे. याचे प्रशिक्षण खर्डी येथील आराेग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या नियमित तपासणीबरोबर गरोदर, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. त्याचबरोबर लसीकरण, बाळंतपण कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. रक्तातील शर्करा, हिमोग्लोबिन तपासणी महत्त्वाची असते. यासाठी ही मशीन महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय साळुंखे, आरोग्य सहायक शिवाजी कांबळे, संजय भोसले, आरोग्य सहायिका सुनंदा सुरवसे, आरोग्य सेवक अजित अभंगराव, मोहन यादव, आरोग्य सेविका उत्कर्षा महानवर, राजमाता कोडे, देवकर, सीएचओ लवटे, गटप्रवर्तक शिंदे, स्टाफ नर्स अर्चना माळी, अण्णा पवार, पिंटू गायकवाड, समाधान लोहार आदींची उपस्थिती होती.