सोलापूर : सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या सरीही कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सकाळपासून सूर्यदर्शनही झाले नाही. तापमानात वाढ होत असतानाच अचानक पाऊस कोसळत असताना आरोग्याच्याही समस्या वाढल्या आहेत. बुधवारी रात्रीपासूनच सोलापूर शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
मंगळवेढा तालुक्यामध्ये साडेआठच्या दरम्यान ग्रामीण भागातील पाठखळ, खूपसंगी, युटोपियन शुगर परिसरात तसेच डोंगरगाव आणि मंगळवेढा परिसरामध्ये नऊच्या दरम्यान अवकाळी रिमझिम पाऊस पडला. या भागातील द्राक्ष बागादार असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.