शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कल्याणराव काळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; माढ्यात उघडपणे करणार युतीचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:44 AM

प्रवेशाचा पक्ष मात्र गुलदस्त्यात : भाजप की शिवसेना याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

ठळक मुद्देभाजपाने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले कल्याणराव काळे हे भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मदत करण्याची तयारी दाखविली आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाची स्थिती पाहता भाजपमध्ये प्रवेश करायचा की शिवसेनेत याचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपविला आहे. 

भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. कल्याणराव काळे हे भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पंढरपूर, सांगोला, माढा विधानसभा मतदारसंघात काळे गटाचा प्रभाव आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे काळे यांचे राजकीय गॉडफादर मानले जातात. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मात्र आम्हाला विश्वास दिल्यास आमच्या भागातील विकासकामे मार्गी लावल्यास आम्ही भाजपला मदत करायला तयार आहोत. पण तत्पूर्वी मी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेईन, असे काळे यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले. 

माढा विधानसभेच्या जागेमुळे पक्ष प्रवेशाचा तिढा कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. माढ्याची जागा ही शिवसेनेकडे आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती कायम राहण्याची शक्यता आहे. कल्याणराव काळे यांनी पुन्हा माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यास पुन्हा अडचण होण्याची शक्यता आहे. या विषयावर कल्याणराव काळे शनिवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

राजकारण करताना संस्थाही कारभार चांगल्या पध्दतीने चालविणे आणि आपल्यासोबत सरकार असणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपात प्रवेश करायचा की माढा लोकसभा निवडणुकीत केवळ पाठिंबा द्यायचा याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच घेणार आहे.   - कल्याणराव काळे

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाधाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा