शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

धावत्या टेम्पोतून सीएनजी गॅसची गळती; आकाशात वायूच्या लोटानं घबराट

By विलास जळकोटकर | Published: September 16, 2023 5:24 PM

शेळगी गावापासून जवळ असलेल्या रघोजी ट्रान्स्पोर्टजवळील हायवेवर सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

सोलापूर : सर्वच वाहनांसाठी वापरात असणारा सीएनजी गॅस वाहून नेणाऱ्या टेम्पोतील टाक्या लिकेज होऊन गॅस गळती सुरू झाली अन् धावत्या टेम्पोमधून गॅसच्या वायूचे लोट आकाशात पसरले. शेळगी गावापासून जवळ असलेल्या रघोजी ट्रान्स्पोर्टजवळील हायवेवर सायंकाळी ही घटना उघडकीस आली. चालकानं प्रसंगावधान राखत वाहन थांबवलं. लागलीच अग्निशामक दलाचा बंद दाखल झाला अन् हैद्राबाद रोडकडे वाहन नेऊन गळती बंद करण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एमएच १३, डीक्यू ६५३१ या आयशर टेम्पोमधून चिंचोळी एमआयडीसी येथून सीएनजी गॅस भरलेल्या ६० टाक्या भरून चालक भीमाशंकर सुसळे हा सायंकाळी द. सोलापूर तालुक्यातील सुरेश पेट्रोलियम येथे सुपूर्द करण्यासाठी निघाला होता. हे वाहन रूपाभवानी मंदिर रोड पास करून पुढे जाताना रघोजी ट्रान्स्पोर्टजवळ वाहनातील टाकीचा व्हॉल्व्हमधून गळती होऊ लागल्याने गॅसचा वायू लोट आकाशात पसरू लागले. हे पाहून सर्व्हिस रोडवरून धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांमधून घबराट पसरली. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने चालक शिवशंकर सुसळे यांनी वाहन थांबविले. उतरून पाहता हा प्रकार पाहून तेही घाबरले. उपस्थितांपैकी एकाने तातडीने अग्निशामक दलास कल्पना दिली.

लागलीच पथक दाखल झाले. हे पाहून चालकाच्याही जिवात जीव आला. दरम्यान, सीएनजी गॅसचे प्रोजेक्ट इंजिनिअर गणेश यादवही दाखल झाले. रहदारीच्या ठिकाणी होणाऱ्या गळती बंद करण्यासाठी त्यांनी हे वाहन खानचाचा हॉटेलच्या पुढील रोडवर नेले. पाहणी करताना व्हॉल्व्ह लिकेज झाल्याचे गळती होत असल्याचे लक्षात आले. अग्निशामक दलाच्या तत्परतेने व्हॉल्व्ह बंद करण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला.तर मोठी दुर्घटना घडली असतीदोड्डी येथे सुरेश पेट्रोलियमकडे सीएनजी गॅसच्या टाक्या खाली करायच्या होत्या. या वाहनामध्ये एकूण ६० टाक्या होत्या. त्या एकमेकाला कनेक्ट होत्या. यापैकी किमान दोन टाक्यांमधील गॅस हवेत पसरल्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाचा बंब वेळीच दाखल झाला अन्यथा मोठी दुर्घटना ओढावली असती, असे मत प्रत्यक्षदर्शींसह फायरमॅन यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर