शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता तालुक्यातील २३८ मतदान केंद्रांवर ६०३ सदस्य निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात सर्वच केंद्रावर मतदारांची गर्दी झाली. दुपारपर्यंत मकरसंक्रांतीचे वाण घेण्याचा कार्यक्रम आजच असल्याने महिला मतदारांनी सकाळच्या टप्प्यात मतदान न करता दुपारी करण्याला पसंती दिली.
सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात १२.२८ टक्के मतदान झाले. त्यात ५९०९ महिला व ८९२४ पुरुष मतदारांनी अर्थात १४,८३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ९.३० - ११.३० या दोन तासाअखेर ३१.३० टक्के मतदान झाले. त्यात १७,५६४ पुरुष तर २१,२५५ महिला मतदार असे एकूण ३७,८१९ मतदारांनी मतदान केले.
दुपारपर्यंत ४०,३८० महिला, तर ४२,७४६ पुरुष अशा प्रकारे ६८.७९ टक्के मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत पेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. या निवडणुकीदरम्यान प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी तालुक्यातील कांदलगावसह इतर गावांतील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी मंडल अधिकारी उमेश डोईफोडे उपस्थित होते.
----
मोठ्या गावातील मतदान
आगळगावमध्ये चार प्रभागात मिळून ३४६० मतदारांपैकी २७८९ ( ८०.६० टक्के ) मतदान झाले. धस पिंपळगावमध्ये १८३७ पैकी १४३९ मतदान झाले. शेंद्रीत १८३४ पैकी १६६२, मतदान झाले. उपळेदुमाला ३९३७ पैकी ३०६५, खांडवीत ३५५३ पैकी २६७०,पांगरीमध्ये ३९५५ पैकी २८६७ (७२.४९ टक्के) तर भातम्बरेमध्ये २८७५ पैकी २३३० मतदान झाले. उपळाई, कांदलगावमध्ये ११९३ पैकी ९२७, वालवडमध्ये ७५० पैकी ६२५, उपळाईत ४४९४ पैकी ३६३०, काटेगाव १७०० पैकी १२७७ मतदान झाले.
---
फोटो : १५ बार्शी पोल
बार्शीत मतदानासाठी वृद्धेला व्हीलचेअरवर घेऊन जाताना.