शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्रामीण भागात सर्दी, पडसे, फ्लूच्या गोळ्या मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 2:47 PM

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना; खासगी डॉक्टरांना रुग्णांचा अहवाल बंधनकारक

सोलापूर: ग्रामीण भागातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हाधिकाºयांनी जारी केलेल्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे आता मेडिकल दुकानदारांना सर्दी, पडसे, फ्लूच्या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत असे बंधन घालण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अद्याप वाढलेलाच आहे. मृत्यूदरही कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे मंगळवारी तालुका वैद्यकीय अधिकाºयांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्य केंद्राच्या हद्दीत कोरोना रुग्णांवर कशाप्रकारे उपचार सुरू आहेत व रुग्णांचा शोध कसा होत आहे याची माहिती घेण्यात आली. जुनाट आजार व ज्येष्ठ नागरिकांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात असलेल्या खासगी दवाखान्यात अनेकजण सर्दी, तापाचा त्रास झाल्यावर उपचारास जातात. याची माहिती आरोग्य विभागाला मिळत नाही. आता खासगी डॉक्टरांना दिवसभरात उपचारास आलेल्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक करा. त्यांच्याकडून आलेल्या यादीनुसार त्या रुग्णाच्या घरी जाऊन अ‍ॅटिजेन टेस्ट करा अशा सूचना डॉ. जाधव यांनी दिल्या आहेत. यामुळे संशयित रुग्णांचा वेळेत शोध होऊन त्यांच्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. संपकार्तील लोक व संशयित रुग्णांचा शोध घेऊन चाचण्या वाढवा. मेडिकल दुकानदारांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊ नये अशा सूचना द्या. जे दुकानदार चिठ्ठीशिवाय औषध देतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना तालुका वैद्यकीय अधिका?्यांना यावेळी देण्यात आल्या आहेत.

उपचारास होतोय विलंबकोरोना संसगार्तून ज्येष्ठ व्यक्तींचा बळी जात आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींचा शोध झाल्याबरोबरच ग्रामीणस्तरावरच उपचाराची व्यवस्था करा. मोठ्या गावात अशी ओपीडी सुरू करण्याचे प्रस्ताव द्या असे आरोग्य अधिका?्यांना सांगितल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद