बिटरगाव येथील केळी उत्पादक शेतकरी महादेव रावसाहेब नलवडे यांच्या जोडओळ पद्धतीने केळी लागवडीच्या प्लॉटला भेट दिली. त्यानंतर शिवाजी सिद्धराम मंगवडे यांच्या केळी काढणी प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकरी यांच्याबरोबर केळी निर्यातविषयी चर्चा केली.
कंदर येथील प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर चालू असलेल्या केळी काढणीपश्चात पॅकिंग युनिटला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.
कंदर येथील केळी उत्पादक व निर्यातदार किरण नवनाथ डोके यांच्या केळी पॅक हाऊस, कोल्ड स्टाअरेज युनिट व कच्च्या केळीपासून वेफर्स निर्मिती युनिटला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.
शेवटी त्यांनी कंदर व परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका कृषी अधिकारी दुरंदे उपस्थित होते, तसेच यावेळी कंदर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जमीन सुपीकता निर्देशांक फलक प्रदर्शित करण्यात आला.
फोटो
०३करमाळा-फार्मर
ओळी
बिटरगाव-वांगी येथील केळी बागेच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने व शेतकरी.