सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाला आहे. देशात बळी जाणारे पाहात आहोत. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती, चिंता यासारख्या नकारात्मक भावना लोकांच्या मनात निर्माण होत आहे. या महामारीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील डॉक्टर, पोलीस प्रशासन, राज्यकर्ते यांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा मुकाबला सकारात्मकतेने करा, असे आवाहन करा असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशन (हॅपी थॉट्स)चे संस्थापक सरश्री यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने आयाेजित केलेल्या ऑनलाइन प्रसारण कार्यक्रमात १८ हजारांहून अधिक साधकांनी हजेरी लावली. सरश्री म्हणाले, आरोग्यापेक्षा सर्वात मोठी संपत्ती कुठलीच नाही. स्वत: आणि इतरांमधला आत्मविश्वास वाढवा. चांगले आरोग्य लाभण्यासाठी प्रयत्न करा. सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. याचबरोबरच लाेकांच्या विचारात बदल आणण्यासाठी तेजज्ञानद्वारे प्रयत्न केले जात असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
----
फोटो : १८ सरश्री