पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप देण्यापूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाने विठ्ठल मूर्ती स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे़ मूर्तीवर करण्यात येणाºया प्रक्रियेसाठी पुरातन विभागाचे अधिकारी पारंपारिक पध्दतीचे सौळे परिधान करूनच मूर्तीला वज्रलेपाचे काम करणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सल्लागार पदाधिकाºयांची मंदिरामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नगराध्यक्षा साधना भोसले, सदस्य शकुंतला नडगिरे, ह़भ़प अंमनेळकर महाराज, ह़भ़प. शिवणेकर महाराज उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज होऊ नये. यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार प्रथमत: मूर्तीची स्वच्छता करण्यात येणार आहे. पुरातन विभागाचे अधिकारी पारंपारिक पध्दतीचे सौळे परिधान करूनच मूर्तीला वज्रलेपाचे काम करणार आहेत. वज्रलेप प्रक्रियाचे सीसीटिव्हीमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.