कै. सुधाकरपंत परिचारक यांना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, संचालक नामदेव झांबरे, हरीश गायकवाड, मेहबूब शेख, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रात नाटोली येथील हनुमान भजनी मंडळाने अप्रतिम गायनाने वातावरणात प्रसन्नता निर्माण केली. यावेळी दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, हरीश गायकवाड, मेहबूब शेख, संतोष कुमठेकर, रवींद्र काकडे, सोमनाथ भालेकर यांच्यासह अनेकांनी कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नामदेव झांबरे, बाळासाहेब शेख, कारखान्याचे पदाधिकारी मुकुंद कुलकर्णी, डॉ. सुधीर पोफळे, रवींद्र काकडे, संतोष कुमठेकर, सोमनाथ भालेकर, सोपान कदम, तानाजी भोसले, सय्यदनूर शेख, अनंत कुलकर्णी, महेश देशपांडे, एस. एस. विभुते, एस. वाय. सय्यद, राष्ट्रीय साखर कामगार संघ माळशिरस तालुका प्रतिनिधी नितीन बेनकर, राजेंद्र व्हनमाने, विजय पाटील, अनंत जाधव, डाॅ. सुधीर पोफळे, अण्णासाहेब भोसले आदी उपस्थित होते.
----
कामगारांच्या कुटुंबाला मदत
कोरोना काळात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना पांडुरंग कारखान्याच्या वतीने मदतीचा धनादेश देण्यात आला. वृद्धाश्रम गोपाळपूर येथे जीवनावश्यक वस्तू व फळांचे वाटप, पंढरपूर पालवी येथे गणवेश वाटप, कुष्ठरोग निर्मूलन निवास पंढरपूर येथे धान्य वाटप, वृद्धाश्रम टेंभुर्णी येथे जीवनावश्यक वस्तू व फळे यांचे वाटप करण्यात आले.
----
फोटो : १७ श्रीपूर