सोलापूर: पत्नीच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रिक्षाचालक, मालकासह इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दाखल झालेल्या खटल्यात सोलापूर मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीस ८ लाख रुपये मयताच्या वारसांना देण्याचा आदेश बजावला. महालोकअदालतीमध्ये वाय. जी. देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
यातील मयत लक्ष्मी लिंगराज पल्लोलू या २४ आॅक्टोबर २०१५ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास कुमठा नाका येथून सिव्हिल हॉस्पिटलकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी एम. एच. १३ जी ८५१५ या रिक्षातून जात होत्या. गेंट्याल टॉकीजजवळ रिक्षाचालक निसार अहमद रशीदखान (रा. ५, पोलीस मुख्यालय, सोलापूर) याने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने त्याने दुभाजकाला धडक दिल्याने रिक्षा उलटली. यात लक्ष्मी पल्लोलू या गंभीर जखमी होऊन मृत्यू पावल्या. यामुळे मयताची वारस मुले अंबादास (वय १५), अक्षय (१४), सुनील (वय १२), अंजली (वय ६ वर्षे) यांचे अज्ञान पालनकर्ते लिंगराज पल्लोलू यांनी अॅड. श्रीनिवास कटकूर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा मोटार अपघात न्यायप्राधिकरण यांच्या न्यायालयात १० लाख रुपये नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला.
न्यायालयाने रिक्षाचालक, मालक व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश बजावला. याकामी वारसातर्फे अॅड. श्रीनिवास कटकूर, अॅड. दीपक मैंदरकर, अॅड. किरण कटकूर, अॅड. मयूरेश शिंदे यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले. याकामी वारसातर्फे अॅड. श्रीनिवास कटकूर, अॅड. दीपक मैंदरकर, अॅड. किरण कटकूर, अॅड. मयुरेश शिंदे यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले.