घोळसगाव येथे २० वर्षांपूर्वी एक साठवण तलाव खोदण्यात आले. या तलावावर पंचक्रोशीतील अनेक गावची पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. शासन नियमानुसार तलावाजवळ किमान २०० मीटरपर्यंत खासगी व्यक्तींना विहीर खोदता येत नाही. मात्र या तलावाजवळील शेतकरी त्रिगुळे यांनी परवानगी न घेता विहीर खोदली आहे. तेथून शेतीला पाईपलाईन केली आहे. पाईपलाईन करताना तलावाचे गाईडबंड फोडले. याबाबत बाबन जमादार यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी रितसर वकिलांमार्फत लेखी तक्रार केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर उपोषण आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे तक्रारदार जमादार यांनी सांगितले.
कोट ::::::::
घोसळगाव तलावाजवळून शेतकरी त्रिगुळे यांनी विहीर खोदून पाईपलाईन केली आहे. तलावाचे ही नुकसान केल्याची तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यावरून स्थळपाहणी करून संबंधितांना नोटीस दिली होती. त्यावरून त्यांनी २४ मार्च रोजी खुलासा दिला आहे. ते वरिष्ठांना पाठवून देण्यात येणार आहे. त्यावरून पुढील कारवाई होईल.
- प्रकाश बाबा,
उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.
कोट ::::::
घोळसगाव तलावात माझी विहीर येत नाही. तसे पत्र पाटबंधारे विभागाकडून मिळाले आहे. त्यानंतर अर्ज केल्यानंतर रितसर परवाना मिळाला आहे. पाईपलाईनसाठी पुन्हा तक्रार होताना तहसीलदारांनी जागेवर येऊन पाहणी करून त्यासाठी परवाना दिलेला आहे.
- सिद्धप्पा त्रिगुळे,
शेतकरी