याबाबत माहिती अशी की, गावातील रतन लक्ष्मण डांगे यांची फसवणूक करून शेतीचा भाडेपट्टा, तयार करून भाडेपट्याच्या मोबदल्यात आलेली रकमेबाबत विचारणा केली असता मारहाण करून यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रामचंद्र भगवान गोसावी यांची जमीनदार म्हणून सही घेऊन त्यांच्या उपळवटे येथील गट नं. ६० या शेतजमिनीवर बेकायदेशीररित्या सातबाऱ्यात फेरफार करून २७ लाख रुपयाचे कर्ज काढले. याचबरोबर दिलीप महादेव यादव यांना ट्रॅक्टरचा कारखान्याशी करार करतो म्हणून घेऊन सह्या घेतल्या. मात्र, कोणताच करार झाला नाही. मात्र, चार महिन्यांनंतर तीन लाख बाकी असलेली कारखान्याची नोटीस आली. या प्रकारे त्याने तिन्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून, आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा आणि अतुल भैरवनाथ खुपसे यास अटक करावी अन्यथा ८ दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवरात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
----