या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश ए.बी. भस्मे , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर टी. ए. संधू, सहदिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश जे. आर. पठाण, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर एन. एस. सबनीस असे चार पॅनेल करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी स्वरूपाची प्रकरणे तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँका, फायनान्स, बार्शी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी एकूण ३७७ एवढी प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली काढण्यात येऊन त्यामध्ये ९४ लाख ३४ हजार ५४४ रुपयांची वसुली झाली. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जयेंद्र जगदाळे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. के. डी. गुंड व उपाध्यक्ष ॲड. रत्नमाला पाटील आदी उपस्थित होते. लोकअदालत यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ए. एम. पानगावकर, एम. ए. पोतदार, विनायक घाडगे यांच्यासह बार्शी, पांगरी, वैराग, करमाळा, कुर्डूवाडी, टेंभुर्णी पोलीस स्टेशनातील पोलिसांनी परिश्रम घेतले.
तडजोडीने मिटली ३७७ प्रकरणे, ९४ लाखांची झाली वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:23 AM