माढा दुय्यम निबंधक कार्यालयात १०९ ग्रामीण व १ नगरपालिका कुर्डूवाडी, १ नगर पंचायत माढा ही व प्रभावक्षेत्र भोसरे मोंडनिंब चव्हाणवाडी टे. बैरागवाडी मो. या गावाची खरेदी-विक्री व्यवहारातील खरेदी घेणारे येतात. हे दस्त नोंदणीसाठी घेणारे, देणार दोन साक्षीदार मान्यता देणार यांना आता आरटीपीसीआर कोरोना चाचण्या करूनच माढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन येणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती माढा दुय्यम निबंधक एक अशोक चव्हाण यांनी दिली.
या कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने दस्त नोंदणी होते. या गर्दीला व कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीत दस्त नोंदणीचे कामकाज चालू होते. माळशिरस येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. करमाळा येथील सेवकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गत महिन्यात खरेदीखतासाठी लोकांना टोकन घेण्याकरिता कार्यालयासमोर रात्री मुकामास राहून टोकन घेण्याची वेळ होती, तरीसुद्धा लोक दस्त नोंदणीसाठी गर्दी करत होते. आता या चाचणीचे प्रमाणपत्र जोडण्याचे सक्तीने केल्याने कार्यालयासमोर शुकशुकाट आहे.
केवळ कार्यालयीन कर्मचारी आहेत. मुद्रांक विक्रेतेही सध्या गर्दी होऊ नये म्हणून येत नाहीत.
माढा शहर शिवसेना अध्यक्ष शंभू साठे व कार्यकर्त्यांनी कार्यालय बंद ठेवण्यासाठी निवेदन दिले आहे.
-----
वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे
माढा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय संबंधित पक्षकाराची दस्ताची नोंदणी करण्यात येणार नाही.
- अशोक चव्हाण, दुय्यम निबंधक, माढा
----
माढा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्टची सक्ती केल्याने हा कोरोना आजाराचा होणाऱ्या फैलावाची साखळी तुटण्यात मदत होत आहे.
- सुधीर गाडेकर, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस