यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोनाचे पेशंट हे पोटनिवडणुकीच्या गर्दीनेच वाढले आहेत. सर्वात मागे असणारा तालुका कोरोनामुळे सध्या सर्वात पुढे आहे. यामध्ये सर्वांनी या संकटावर मात करून नव्या जोमाने पुन्हा आपला गाव, तालुका कसा प्रगतीपथावर येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. येत्या १० ते १५ दिवसात हे कोविड सेंटर सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा येथे मृत्यू पडलेल्या महिलेची चौकशी करून अहवाल तत्काळ द्यावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्निल रावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, नगराध्यक्षा अरुणा माळी, नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, पक्षनेते अजित जगताप, ओबीसी सेलचे अध्यक्ष लतिफभाई तांबोळी, सोमनाथ माळी, राहुल टाकणे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.