कै. कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील विकासनगर येथे अकलूज ग्रामपंचायतीमार्फत झोपडपट्टी पुर्नवसन करून विविध शासकीय योजनेतून कॉंक्रिट रस्ते, गटार व दिवाबत्तीची सुविधा करण्यात आली आहे. १४ वा वित्त आयोग योजनेतून १५ लाख २५ हजार रुपयांचे जीआय पाईपलाइन करणे हे काम पूर्ण केले आहे. सदरची योजना कार्यान्वित करण्यासाठी २ जूनला जमिनीअंतर्गत असलेली जुनी पाईपलाइन बंद केली आहे. त्यामुळे सदर परिसरातील लोकांना नवीन कनेक्शन घ्यावे लागणार आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव व लोकांच्या हाती रोजगार नसल्याने अकलूज ग्रामपंचायतीने सर्व नळ कनेक्शनधारकांकडून वर्तमान स्थितीत १,५०० रुपये रोख व उर्वरित रक्कम १,५०० रूपये टप्या-टप्याने भरण्याची सवलत देऊन नळकनेक्शन देण्याचे ठरविले आहे. सदर भागातील नागरिकांनी नवीन योजनेतून नळ कनेक्शन घ्यावे, असे आवाहन सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.