यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, संचालक तानाजी झोळ, सुनील सावंत, अशपक जमादार, सुजित बागल, विनय ननवरे, मानसिंग खंडागळे, तात्यामामा सरडे, राजेंद्र पवार उपस्थित होते.
कारखान्याने चालू गाळप हंगामात ४ लाख ७० हजार मे. टन ऊस गाळप करून ४ लाख १८ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २ कोटी ५६ लाख ७५ हजार ९५० युनिट एवढी वीज निर्मिती केली आहे.
सरासरी साखर उतारा १० टक्के मिळाला. तरीही इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापुढील काळात डिस्टलरी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देता येईल, असे चेअरमन विक्रम शिंदे यांनी सांगितले.
गाळपासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान
याप्रसंगी चालू गाळप हंगामात कारखान्याला सर्वांत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, वाहनमालक, तोडणी मुकादम यांचा कारखान्याच्या वतीने रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डायरेक्टर जनरल हरीदास डांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन मुख्य शेती अधिकारी जगदाळे यांनी केले.
कोट ::::::::
यंदा राज्यातील साखर कारखान्यांना कमी साखर उताऱ्याचा फटका बसला. २६५ जातीच्या उसाला साखर उतारा कमी असल्याने त्याचा साखर उत्पादनावर परिणाम झाला. पुढील हंगामात कारखाना प्रतिदिन ६००० मे. टनाने चालवण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
- एच. बी. डांगे,
कार्यकारी संचालक