सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातेवाईक तणावाखाली राहून मनात भीती कायम असल्याने आजार बळावत असल्याचे सांगून रुग्ण आणि नातेवाइकांनी भीती न बाळगता आनंदी मन:स्थिती, आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, यावर कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रशांत सरुडकर, प्रा. शिवानी लिमये, सागर महाराज बोराटे, अल्लाउद्दिन शेख, महादेव माने, शशांक मोहिते, सुरेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी शिक्षक समीर लोणकर, मनीषा पांढरे यांनी परिश्रम घेतले, तर गिरिजा नाईकनवरे यांनी निवेदन केले.
शिक्षण विभागाच्या तणावमुक्ती कार्यशाळेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:22 AM