पंढरपूर : सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाची भीती जनमाणसात मोठ्या प्रमाणात आहे. इतर गावातून आलेल्या लोकांना परिसरातील लोकांकडून वाळीत टाकल्याचा अनुभव येत आहे; मात्र असे असलेतरी पोलीस प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या कोविड वॉरियर्सच्या मदतीमुळे होम क्वारंटाईन केलेल्या लोकांचा आत्मविश्वास देखील वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडॉऊन सध्या शिथिल झाले आहे. यामुळे आपापल्या गावी परतणाºया लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये काही शासकीय परवानगी घेऊन येत आहेत. तर काही विनापरवाना येत आहेत. त्याचबरोबर रेड झोन जिल्ह्यातून येणाºया लोकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बाहेरुन आलेल्या लोकांमुळे शहराला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
यासाठी उपविभागीय पोेलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पो.नि. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाने निर्भयापथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पो.ना. नितीन चवरे, पो.ह. अविनाश रोडगे, पो.कॉ. कुसुम क्षीरसागर, पो.कॉ. नीता डोकडे, पो.कॉ. चंदा निमगिरे, समाजसेविका डॉ. संगीता पाटील, चारुशिला कुलकर्णी यांनी १२५ ‘कोविड वॉरियर्स’ नेमले आहेत. कोविड वॉरियर्स म्हणून शहरातील सामाजिक कार्यकर्र्ते, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, वकील व डॉक्टर देखील काम करत आहेत.
निर्भया पथकाच्या मदतीने हे कोविड वॉरियर्स पंढरपुरात येणाºया लोकांवर गुप्तपणे लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींवर निगराणी ठेवत आहेत.
कोरोना रोगामुळे जीव गमवावा लागतो, यामुळे होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना मदत करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत, परंतु कोविड वॉरियर्स आवश्यक ती सुरक्षित काळजी घेऊन होम क्वारंटाईन लोकांना गरजेच्या वस्तू आणून देत आहेत. यामुळे कोविड वॉरियर्समुळे पंढरपूर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.
अधिकारी, कोविड वॉरियर्सचे मानले आभार- मी व माझी आई बाहेरगावावरुन पंढरपूरला आलो होतो. यामुळे आम्हाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हा कालावधी घरातच पूर्ण केला आहे, परंतु घरातून बाहेर पडू नये, यासाठी आम्हाला आवश्यक ते साहित्य पोहोच करण्याचे काम कोविड वॉरियर्स विक्रम टिंगरे, प्रमोद कुलकर्णी व ऐश्वर्या शिंगटे यांनी केले. तसेच प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह निर्भया पथकाची देखील भेट देत होते. या सर्वांनी आम्हाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले. यामुळे अधिकारी व कोविड वॉरियर्सचे जगदीश कुलकर्णी (रा. इसबावी) यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
प्रांताधिकारी करतात व्हॉट्सअॅपद्वारे सूचना- कोविड वॉरियर्स रोज काय काम करतात. ही माहिती घेण्यासाठी ‘इसेंन्शियल कोविड वॉरियर्स’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती घरी आहेत. त्यांच्यामध्ये कोणती लक्षणे आढळून आली आहेत.याचे रोज अपडेट मिळत आहे. या सर्व कोविड वॉरियर्संना आवश्यक त्या सूचना ग्रुपवर करण्याचे काम प्रांताधिकारी सचिन ढोले व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे करत आहेत.
पंढरपूर शहराच्या प्रत्येक भागात वॉरियर्स आहेत. यामुळे शहराच्या कानाकोपºयात घडणाºया घडामोडींची अद्ययावत माहिती आम्हाला मिळते. होम क्वारंटाईन लोकांवर लक्ष ठेवण्याचे काम होत आहे. यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोविड वॉरियर्सचे मोठे योगदान ठरत आहे.- डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी