अक्कलकोट तालुक्यात प्रत्यक्षात निवडणूक लागलेल्या ६२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी दिवसभर अत्यंत चुरशीने, किरकोळ घटना वगळता शांततेत ७५.८६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली.
प्रत्येक गावात सकाळपासूनच मतदान चुरशीने होत होते. म्हणून सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३१.३६ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत ५१.१९ टक्के मतदान झाले. तालुक्यातील वागदरी, जेऊर, नागणसूर, चपळगाव या मोठ्या गावांत अत्यंत चुरशीने ७५ मतदान झाले आहे. अनेक गावांत स्थलांतरित मतदारांना खासगी वाहनांतून आणले जात होते.
परस्परविरोधी गटात बाचाबाची... पोलिसांचा हस्तेक्षेप
नागणसूर येथील प्रभाग-५ मधील बूथवर परस्परविरोधी गटामध्ये किरकोळ बाचाबाची होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केले. वागदरी येथील प्रभाग २ मध्ये पोलीस मतदान वेळ संपल्याचे सांगत लोकांना हद्दीतून बाहेर काढत होते. तेव्हा उमेदवार राजकुमार हुग्गे यांनी हुज्जत घातल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. काही वेळात सोडून दिल्याचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांनी सांगितले. मिरजगी येथे मतदान केंद्राच्या हद्दीत बेकायदेशीरपणे काही लोक थांबल्याने पोलिसांनी त्यांना बाहेर काढताना काही टवाळखोरांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली. त्यामुळे काही काळ वातावरणात तंग बनले होते.
फोटो
१५अक्कलकोट-काझीकणबस
ओळी
मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन घेऊन आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या पूर्वसंध्येला काझीकणबस येथे जेवणाची सोय केली होती.