जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे आंदोलन केले. शहराध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी काँग्रेस कार्यालयासमोर या आंदोलनाचे आयोजन करताना प्रतीकात्मक पेट्रोल पंपाची उभारणी केली. दोन पेट्रोल पंपाच्या यंत्रावर ती भाजपाशासित काळात झालेली पेट्रोल दरवाढ व काँग्रेसशासित काळामध्ये असलेले पेट्रोलचे दर हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदोलनस्थळी गॅस टाक्या ठेवून दोन्ही सरकारच्या काळातील दर लावून उपस्थितांचे लक्ष वेधले.
यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल मस्के व युवक शहराध्यक्ष संतोष शेट्टी, दत्ता गाढवे, तालुका कार्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, सतीश पाचकुडवे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, अल्पसंख्याक शहराध्यक्ष राकेश नवगिरे, जिल्हा आरोग्य सेलचे अध्यक्ष वहाब पठाण, शहर उपाध्यक्ष भीमराव राजगुरू, नीलेश मांजरे-पाटील, ओबीसी शहराध्यक्ष विजय ठाकूर, बब्रुवान धावारे, ॲड. निवेदिता आरगडे, महिला शहराध्यक्ष सुनीता गायकवाड, तालुकाध्यक्ष शीला हिंगे, महिला जनरल सेक्रेटरी अनिता बारंगुळे, वनिता नाईकवाडी उपस्थित होते. या आंदोलनास मनसेचे शहराध्यक्ष राजेंद्र गायकवाड तसेच अन्य संघटनांनी पाठिंबा दिला.
२७बार्शी आंदोलन