सोलापूर : आरएसएस, भाजपापेक्षाकाँग्रेसच डेंजर आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण माने यांनी आमची लढाई काँग्रेसबरोबर असल्याचे सांगितले.
काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाचा खून केल्याच्या टीकेला उत्तर देताना माने म्हणाले की, शिंदे यांचा भ्रमनिरास झाल्याने ते काहीही बरळू लागले आहेत. त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की प्रकाश आंबेडकर सोलापुरात निवडणूक लढवतील. आंबेडकर यांनी संविधानाचा खून केला म्हणजे नेमके काय केले हे शिंदे यांनी सांगावे. काँग्रेसच जातीयवादी असून, भाजपाची बी टीम आहे. काँग्रेसने गेल्या ७0 वर्षात दुसºयांची लीडरशिप निर्माण होऊ दिली नाही. आता भाजपा व काँग्रेस आलटून पालटून सत्तेवर येत आहेत. आम्ही आरएसएस व भाजपाविरूद्ध युद्ध करतोय.
पण शिंदे यांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत. प्रकाश आंबेडकर यांना दहा हजार तरी मते पडतील काय असे सांगणारे शिंदे यांनीच आता स्वत:ला किती मते पडतील याचे गणित करत बसावे असा टोला लक्ष्मण माने यांनी लगावला.