बार्शीमध्ये आयोजित जिल्हा युवक काँग्रेसच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर गाढवे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोरके, शहराध्यक्ष जीवनदत्त आरगडे, तालुका कार्याध्यक्ष तानाजी जगदाळे, सतीश पाचकुडवे, जिल्हा सरचिटणीस दत्ता गाढवे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले, डॉ. वृषाली पाटील, ॲड. निवेदिता आरगडे, डॉ. विजय साळुंखे, महिला शहराध्यक्ष सुनीता गायकवाड, महेश पवार, अल्पसंख्याक जिल्हा समन्वयक वसीम पठाण, अल्पसंख्याक नूतन शहराध्यक्ष राकेश नवगिरे, ज्येष्ठ नेते रमजानभाई पठाण उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल मस्के यांनी केले. प्रास्ताविकामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अरगडे यांनी युवक कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. यावेळी तालुकाध्यक्ष कोरके, तानाजी जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आले तर काय होऊ शकते हे विधान परिषद निवडणुकीत राज्यात झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निकालात दाखवून दिल्याचे सांगितले.
यावेळी तांबे यांनी अल्पसंख्याक, दलित, मुस्लीम समाजाला आजपर्यंत फक्त काँग्रेस पक्षाने न्याय दिला आहे. काँग्रेसचे राजकारण सर्वसमावेशक आहे. युवक कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप तिवाडी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश मांजरे पाटील यांनी तर आभार ॲड. निवेदिता आरगडे यांनी मानले.
----
२८बार्शी-काँग्रेस मेळावा