सावरकरांचा अवमान; प्रियांक खर्गे यांचा पुतळा केला दहन, भाजपाचे कार्यकर्ते संतप्त

By रवींद्र देशमुख | Published: December 8, 2023 02:45 PM2023-12-08T14:45:32+5:302023-12-08T14:47:54+5:30

हिंदूसंघटक सावरकरजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, प्रियांक खर्गे मुर्दाबाद, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात येत होत्या.

Congress government minister Priyank Kharge insulted freedom fighter Savarkar and BJP workers protested | सावरकरांचा अवमान; प्रियांक खर्गे यांचा पुतळा केला दहन, भाजपाचे कार्यकर्ते संतप्त

सावरकरांचा अवमान; प्रियांक खर्गे यांचा पुतळा केला दहन, भाजपाचे कार्यकर्ते संतप्त

सोलापूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा अवमान केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्यावतीने त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन करण्यात आले. गुरुवारी सकाळी कन्ना चौकात हे आंदोलन झाले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याबद्दल त्यांचा देशभरात निषेध होत असतानाच सोलापुरातही भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, हिंदूसंघटक सावरकरजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, प्रियांक खर्गे मुर्दाबाद, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात येत होत्या.

याप्रसंगी भाजयुमो शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, शहर उपाध्यक्ष नागेश येळमेली, विजय कुलथे, अजित गादेकर, सरचिटणीस बसवराज गंदगे, वैभव हत्तूरे, पंकज काटकर, सिद्धार्थ मंजेली, रवि कोठमाळे,  शहर उत्तर संयोजक शिवराज झुंजे, शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे, चिटणीस प्रेम भोगडे, शिवशरण साखरे, शांतेश स्वामी, माजी अध्यक्ष गणेश साखरे, संस्कार नरोटे, समर्थ व्हटकर, पवन आलुरे, निलेश शिंदे, विशाल शिंदे, अमित जनगौड, भार्गव बच्चू, उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, पुरुषोत्तम पोबत्ती, अनिल कंदलगी, गिरीश बत्तुल, दत्तात्रय पोस्सा, आनंद बिर्रु, प्रविण कांबळे, आदींसह मोठ्या संख्येने भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress government minister Priyank Kharge insulted freedom fighter Savarkar and BJP workers protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.